
Dr. Atindra Sarvadikar
My Journey:-

At this stage when I look back I realize that all my thinking, experiences, actions, reactions are associated to music directly or indirectly; especially when music becomes my life's goal and also a full time profession.
I was born in Solapur on 13 Jan 1985. Solapur is comparatively a small place. We are a middle class family. My mother was a music teacher and my father had been working for LIC. My elder brother was excellent in academics & was also interested in music.Though my mother was a music teacher nobody in our family particularly followed music performance as a full-time career. However, I was greatly fascinated towards music!! Don’t know how!! The passion was so much that I started feeling like there was nothing as important as music for me...
The place of the guru in our culture is huge and truly exalted -- your parents are your first and natural gurus and then comes the place of your teacher, guide and mentor. In fact, the guru's status is often deemed higher than that of anybody else including God as per perhaps the most radical social reformer of this land, Sant Kabeer. I have been extremely fortunate in finding gurus who were not only accomplished performer, vidwans but also great people. The adjective, "Praatah smaraniya" totally befits them. My life has been blessed and sweetened with the nectar of their unreserved affection and blessings since I started training with them at various stages of my musical development. My musical journey began quite early in life when I was five years old. as I told fortunately I got my Mother Smt. Vrinda Sarvadikar as my first Guru and critic. I got further guidance from Late Shri Dattusinghji Gaherwar who was a well known music teacher from Solapur. He was disciple of Pt. Vinayakrao Patwardhan of Gwalior Gharana. He was blind from his birth. But was independent, music devoted and disciplined person. His sense regarding sound was such powerful that even by listening sound of walking he could guess the person ... ! From that period I remember struggling hours and doing riyaz to improve my singing ability.
During that period I heard all styles of music so passionately and I started having a liking towards a certain style. That was no one but living legend 'Dr. Prabha Atre' the doyen of Indian Classical Music, whose contribution and personality is unique in Indian classical music. Prabhaji's music not only challenges isteners' brain but at the same time it touches their soul. This moved me. She listens to me as a judge. She consented to teach me. I was overjoyed. I had passed a difficult test. But further proceedings were extremely tough as I had not undergone any mainstream "Taaleem" (learning) till then. To learn even a small piece I had to struggle for hours. Because of kind nature of Prabhatai I could tremendously improve in further years... I consider it to be my singular privilege to have had the chance to learn from Prabha ji.
I completed my academic graduation in stream of science hence I got the degree of B.Sc. For my Further academic study in Music (since 2007) I moved to Mumbai.
All these experiences have given proper thinking process to me. A conscious observations, learning and my inner stinct opend the doors of composition, writing, anchoring as well as becoming good connoisseur and guru. The ability to experiment, thinking in different and own way and to imagine many facets of single thing is generated within me. Also I hold my post graduation Masters degree in music (with gold medal) at University of Mumbai.
After my Masters degree I have done my Doctorate in Music from University of Mumbai. It's a proud feeling that this is a first doctorate degree conferred by University of Mumbai. My research work is published in the format of book named - Kirana Gharane Parampara ani Pravah by Sanskar Prakashan.
I have performed successful concerts and shows in India and abroad, I have recorded commercially for known labels and music companies,print and visual media given coverage to my work time to time, the path seems to be getting brighter and brighter with the blessings from all...
During my small journey I have the love and concern from the people who are like lamp house, whose support and blessings is back bone to me
I have come along, all this far, without the backing of any Godfather/Godmother or institution, all on the basis of my own merit and talent. I attribute my success to hard work and the blessings of my parents, my Gurus and all my well-wishers and friends who are eminent personalities from a variety of fields like music, theater, dance, advertising, engineering, IT, education and many o
' #################################################################################################
'अतिंद्र-स्वर'
लेखक - श्री किरण सोहळे
डॉ अतिंद्र सरवडीकर आजच्या युवा पिढीमधील उल्लेखनीय गायक कलाकार आहेत. प्रत्यक्ष मंचप्रस्तुती बरोबरच नव्या संगीत रचना करणं, लेखन, संशोधन तसेच गुरू म्हणूनही ते ख्यातिप्राप्त आहेत. इतर कलाकारांची गाजलेली गाणी सादर करून टीव्हीवर लोकप्रियता मिळवणारे अनेक कलाकार आपण आजकाल पाहतो; परंतू आपल्या स्वतंत्र प्रतिभेने स्वतःचा कलाविष्कार घडवणारे कलाकार दुर्मिळ असतात. आणि म्हणूनच डॉ अतिंद्र सरवडीकर यांना संगीत जगतात विशिष्ट स्थान प्राप्त झालं आहे. शास्त्रोक्त संगीताखेरिज, ठुमरी - दादरा, भावगीतं, चित्रपट संगीत, गीत, गझल, भक्तीसंगीत, फ्यूजन अशा अनेक गानप्रकारांवर त्यांचं समान प्रभुत्व आहे. स्वतःच्या ढंगात हे सर्व गायनप्रकार ते सादर करतात. तशा अनेक नवीन संगीतरचनाहि त्यांनी केल्या आहेत. जाणून घेऊया डॉ अतिंद्र सरवडीकर यांच्या कलाप्रवासाबद्दल..
डॉ अतिंद्र सरवडीकर यांचा जन्म दि 13 जानेवारी १९८५ रोजी सोलापूर येथे झाला. त्यांच्या मातोश्री सौ वृंदा सरवडीकर सोलापुरातल्या नावाजलेल्या संगीत शिक्षिका, त्यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली अतिंद्रजींनी वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षांपासून संगीत साधनेस प्रारंभ केला. वयाच्या ७ व्या वर्षी सोलापुरातल्या गणेशोत्सवात गाण्याची तासभराची ‘मैफल’ देखील लहानग्या अतिंद्रने हातात तानपुरा घेऊन एकट्याने रंगवली व जाणकार रसिकांची शाब्बासकी मिळवली. पुढे दत्तूसिंग गहेरवार यांच्या अतिशय कडक तालमीत संगीत शिक्षण सुरू झालं . वयाच्या १६ व्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाची ‘तबला विशारद’ तर १७व्या वर्षी ‘गायनात विशारद’ हि पदवी मिळवली. पण एवढ्यावर समाधान झालं नव्हतं. आता त्यांना ओढ लागली होती ती मोठं गाणं शिकायची... संगीत सागरात खोलवर शिरण्याची आणि संगीताच्या भव्य स्वरूपाचा उत्कट अनुभव घेण्याची... शिष्याच्या अखंड परिश्रमाला गुरूंच्या वरदहस्ताची जोड मिळाली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. 'परिसाच्या संगे लोह बी घडले, लोह बी घडले परिसची झाले.' असंच काहीसं...
भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेत आजवरच्या श्रेष्ठतम कलाकारांमध्ये ज्यांचा अग्रक्रमाने समावेश केला जातो त्या स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ प्रभा अत्रे यांचं शिष्य होण्याचं परम सौभाग्य डॉ अतिंद्र सरवडीकर यांना वयाच्या अवघ्या १७व्या वर्षीच लाभलं. त्याचं झालं असं की, स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता, त्यानिमित्त सोलापुरात त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला गेला होता, तेव्हा अतिंद्र यांना प्रभाताईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली. त्यांच्या कलाकुसरीच्या गाण्याचा अतिंद्र यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्यांनी प्रभाताईंचं शिष्यत्व पत्करण्याचा ध्यासच घेतला. प्रभाताईंच्या गाण्यात भावपूर्णतेबरोबरच अफाट बुद्धिमत्तेचा वापर स्तिमित करणारा होता. मोठ्या मुश्किलीनं प्रभाताईंशी संपर्क साधता आला. मुंबईत जाऊन प्रभाताईंची भेट घेऊन शिष्य म्हणून स्वीकारण्याची अतिंद्रनी ताईंना विनंती केली. प्रभाताईंनी आधी सर्व बाजूंनी कसून परीक्षा घेतली, पारख केली आणि मगच शिष्य म्हणून स्वीकारलं. मग गुरुशिष्य परंपरेने गुरुगृही राहून खूप शिकायला मिळालं. कठोर मेहनतीचे अक्षरशः पहाड फोडले. अनेक तासांचा नियमित रियाझ केला. प्रभाताईंची कलाकुसरीची चिंतनशील गायकी गळ्यावर चढवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले, रियाज करावा लागला. सुरुवातीला सोलापूर मुंबई असा दर आठवड्याला रेल्वेचा प्रवास करून कष्ट करून विद्या मिळवली. पुढे प्राणीशास्त्रात पदवीधर झाल्यानंतर पूर्णवेळ संगीत शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि मुंबईलाच स्थलांतरित झाले. २००३ सालापासून हा शिक्षणाचा प्रवास सुरु झाला आणि आज डॉ अतिंद्र सरवडीकर हे स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ प्रभा अत्रे यांचे वरिष्ट शिष्य आहेत. एका ऋषितुल्य महान गुरूचा आशीर्वाद त्यांनी संपादन केलाय. प्रभाताईंबरोबर त्यांच्या कार्यक्रमांमध्ये साथसंगत करण्यासाठी जाणे, ताईंनी स्वतः आखलेल्या कार्यक्रमांमध्ये, कार्यशाळांमध्ये व त्यांच्या प्रकट मुलाखतींमध्ये गायन प्रस्तुत करणे यांसारखे अनुभव अत्यंत समृद्ध करणारे व दिशादर्शक ठरले.
पुढे मुंबई विद्यापीठातून संगीत विषयात एमए हि पदवी सुवर्ण पदकासह मिळवली. दीर्घ संशोधनानंतर डॉ अतिंद्र सरवडीकर यांना मुंबई विद्यापीठातून मिळालेली संगीत विषयक डॉक्टरेट हि मुंबई विदयापीठातर्फे प्रदान केली गेलेली संगीत विषयातली पहिली डॉक्टरेट आहे. त्यापूर्वी मुंबई विद्यापीठात संगीत विषयासाठी संशोधनाची सोय नव्हती, ती व्हावी, यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेत, या प्रयत्नांना यश आलं आणि तिथे हे नवीन दालन खुलं झालं. संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी तो प्रबंध मिरज येथील *अब्दुल करीम खाँ साहेब* यांच्या समाधीवर ठेवला "तो क्षण खूपच रोमांचित करणारा होता" असे अतिंद्र सांगतात. खां साहेब हे किराणा घराण्याचे जनक आणि याच घराण्याचा अत्यंत सखोल अभ्यास अतिंद्रजींनीं रात्रीचा दिवस करून केला. योगायोग असा की डॉक्टरेट मिळाल्यानंतर पहिल्या रंगमंचीय सादरीकरणासाठी डॉ अतिंद्र सरवडीकर यांना मिरज येथे होणाऱ्या उस्ताद अब्दुल करीम खान स्मृती निमित्त आयोजित कार्यक्रमात आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रण आले . जणू काही खांसाहेबांनी डॉ अतिंद्र सरवडीकर यांची सेवा रुजू करून घेतली...
या सर्व अभ्यासात डॉ अतिंद्र अतिशय अंतर्मुख बनले. त्यांच्या गानप्रतिभेला नवे धुमारे फुटले. मूळच्या संवेदनशील स्वभावाला चिंतनाची जोड लाभली. या अभ्यासावर आधारलेला "किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह" हा त्यांचा मौलिक शोध ग्रंथही प्रकाशित झाला. त्याला जाणकार व रसिकांची बहुमूल्य दाद लाभलीये. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.
जगभरातील अनेक प्रतिष्ठित स्वरमंचांवर डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपल्या संगीत साधनेचा अभूतपूर्व परिचय दिला आहे. सवाई गंधर्व समारोह कुंदगोळ, इंडिया फेस्टिवल लंडन, पूरब अंग ठुमरी उत्सव बनारस , एनसीपीए मुंबई, सप्तक अहमदाबाद, नॅशनल कॉन्फरेन्स ऑफ म्युझिक कोलकाता अश्या अनेक कार्यक्रमांचा यात समावेश आहे. शास्त्रोक्त संगीताखेरिज, ठुमरी - दादरा, चित्रपट संगीत, गीत, गझल, भक्तीसंगीत, फ्यूजन अशा अनेक गानप्रकारांवर त्यांचं प्रभुत्व आहे. रागदारी संगीतातल्या अनेक रागांमध्ये विविध प्रकारच्या बंदिशी त्यांनी बांधल्यात त्यात हंसकिंकिणी, चक्रधर, अपूर्व कल्याण, यमनी बिलावल, बसंती केदार, सावनी, गावती, मालती यांसारखे अनेक अप्रचलित रागही आहेत. ठुमरी दादऱ्याच्या रसपूर्ण ललित रचना आहते. तर सुनंद ताल, आडा चौताल, सवारी, मत्त ताल यां सारख्या अनवट तालांचाही समावेश आहे. 'हेमलता' हे एक नवं रागरूपही त्यांनी मांडलं आहे. त्यांनी रचलेल्या या काही बंदिशींचे शब्द पहा यातील रचनात्मकता आणि शब्द योजना मोहून टाकते:-
राग सरस्वती (आडाचौताल )
स्थायी: हंससवारी ब्रह्मदुलारी
वीणापाणी महाग्यानी
जगपालिनी जगमाता
अंतरा: कमलासनी चंद्रवदनी
भवभय निवारिणी
अभयम देही देही माता
राग चक्रधर (रूपक)
स्थाई: जियरा सुख पायो पायो रे
जब ते सुपने मे आयो
श्याम सलोना मोरा रे ....
अंतरा: निरखी छबी मनहारी
मोर मुकुट चक्रधारी
सुपन मे आयो
श्याम सलोना मोरा रे .....
राग सोहनी (द्रुत एकताल)
स्थाई: रंग रंग डार डार
पात पात फुली
बरन बरन कुसुम कुसुम
फुलन सकल लागी रे।
अंतरा: कुसुमाकर जो आवत
जगत सकल मुसकावत
कोयलिया कुकत
पवन देत झकोरी रे।।
राग वृंदावनी सारंग चतुरंग (आडाचौताल)
मधुरंग सारंग सुहायो
सुरन जस रवी तेज समायो
दीर दीर दारे, दारे दारे दारे दानि
दिम तन दिम दिम तन देरेना
धा धिं ना धा तीं ना
धा धा धिं ना, धा धा तीं ना
निसामरेम रेसानिसा मरेपम निपमप नि
पम रे म प म नि प सां नि रें सां नि सां
निपनि, पमप, मरेम, रेसानिसा
डॉ अतिंद्र सरवडीकर यांनी आपला बंदिशींचा संग्रह प्रकाशित करावा अशी त्यांच्या चाहत्यांची सततची मागणी असते. रागदारी संगीताच्या नामवंत म्युझिक कंपन्यांकडून प्रकाशित झालेल्या त्यांच्या सीडी उपलब्ध आहेत. त्याच बरोबर, नभातले तारे, दिवे लागले रे, कैसे कहदू के मुलाकात नही होती है, पत्नी गायिका सौ प्रिया सरवडीकर सोबत गायलेलं स्वतःच लिहिलेलं “जय जय वंदे मातरम” यां सारखी त्यांची म्युझिक व्हिडीओ रूपातली गाणी चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत.
जय जय वंदे मातरम,
गीत नही है, मंत्र है जिसपर
हुए निछावर जनम
जय जय वंदे मातरम्
कावेरी से गोदावरी तक
तुंगासे गंगा सिंधू तक
हिमाचल से विंध्याचल तक
बहे गीत ये अमर...
हिमनंदिनी से कन्याकुमरी
हाजी आली और बाबा चिश्ती
महावीर और गौतम नानक
समाये खुदमे सबन...
गीत एक है, एक है ज्योती
विश्व सराहे भूमी अनुठी
है मन प्रीती, दे जग शांती
है ये सत्य वचन...
जय जय वंदे मातरम्
त्यांनी तमिळ भाषेतही काही गाणी गायली आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने त्यांनी स्वतःच्या रचनांची प्रस्तुती दिली आहे. डॉ अतिंद्र सरवडीकर मुंबई आकाशवाणीचे अर्हता प्राप्त कलाकार असून टीव्हीवरील अनेक कार्यक्रमातही त्यांचा नियमित सहभाग असतो.
संगीत प्रेमींना योग्य शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी Dr Atindra Sarvadikar's Academy of Music (ASAM) या संगीत अकादमीची मुंबईत स्थापना केलीये, मुंबईतले आणि मुंबईच्या बाहेरचे जवळपास १०० संगीत शिकू इछीणारे संगीतप्रेमी यामुळे लाभान्वित होतायत.
याखेरीज शास्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा या साठी डॉ. अतिंद्र नेहमीच प्रयत्नशील असतात. आपल्या शिष्यांना देखील या कार्याप्रती समर्पित होण्याची शिकवण ते देतात.आपल्या गुरु स्वरयोगीनी डॉ.प्रभा अत्रे यांच्या ८५व्या जन्मवर्षाचे औचित्य साधत *लिसनर्स काँर्नर* हा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला होता. घरगुती मैफिल हि संकल्पना हळूहळू लोप पावत चालली आहे हे लक्षात घेऊन वर्ष भर प्रतिमाह १ या प्रमाणे वर्षभरात १२ संवादात्मक संगीत मैफीलींचे आयोजन करत त्यांनी सर्वसामान्य श्रोत्यांना मुंबईत एक सांस्कृतिक दालन उघडलं. लिसनर्स काँर्नर या उपक्रमात अनेक नव्या जुन्या दिग्गज कलाकारांनी आजवर आपली हजेरी दिली आहे. मुंबईतील १२ मैफीलींच्या अभूतपूर्व यशस्वीतेनंतर सध्या "लिसनर्स कॉर्नर महाराष्ट्र दौरा" या अनोख्या संकल्पनेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात शास्त्रीय संगीताचा श्रोता घडवण्यावर भर असणाऱ्या मैफली ते आयोजित करतात. याद्वारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये, खेडोपाडी संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी डॉ अतिंद्र सरवडीकर प्रयत्नशील आहेत. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणूनही ते सध्या कार्यरत आहेत.
महाविद्यालयीन जीवनात विविध प्रतिष्ठित संगीत स्पर्धांमध्ये मिळालेले २८ पुरस्कार, देश पातळीवरच्या अतिशय मोठा बहुमान समजल्या जाणाऱ्या मानाच्या अनेक शिष्यवृत्त्या तसेच पुढील व्यावसायिक कारकीर्दीतहि राज्य व देशपातळीवरील अनेक महत्वाचे पुरस्कार डॉ अतिंद्र सरवडीकर यांना प्राप्त झाले आहेत. जगदगुरु शंकराचार्यांनी "रसगंधर्व" असा त्यांचा उल्लेख केला होता... शेवटी डॉ अतिंद्र सरवडीकर यांच्या मध्ये दडलेला संवेदनशील कवी पुढे आणणारी एक कविता अनुभवूया आणि स्वत:च्या विचारातून संगीत मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या सृजनशील युवा कलाकाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया !!
गीत व्हावे एक ऐसे
अंतराला स्पर्शणारे ,
नाद बिंदू वेचताना
अनंताशी पोचणारे ।
या जीवाच्या घालमेली
त्या जीवाला सांगणारे,
दुख वेदनान्तुनी फुलुनी
विश्व सारे गंधणारे ।
वेचीताना सूर सुमने,
फुल पानी जागणारे,
लाजणाऱ्या मुग्ध कलिका,
चंद्र बिंदू चुंबणारे ।
गंधवारा वाहताना
तरु - लताना वेढणारे,
थाप पडता कडकडाती
रंध्र रंध्री धुंदणारे ।
अंधारल्या मनातुनी ,
एक पणती लावणारे,
दोन हृदये सांधताना ,
हात हाती गुंफणारे ।
सूर माझे शब्द माझे,
वाट माझी चालणारे,
नाद बिंदू वेचताना
अनंताशी पोचणारे ।
